पहिला पाऊस पडलाना की आजही माझ्या डोळ्यांसमोर तोच उभा राहतो… संध्याकाळ व्हायची मी खिडकीतून पाऊस बघत बसायचे.. ढगळलेल आभाळ ,धो धो पडणारा पाऊस आणि कर्णकर्कश्य अश्या त्या विजा….अंगात अशी शिरीषीरी यायची..वाटायच या क्षणालातरी एकट असू नये..
मग नेहमी प्रमाणे तो दिसायचा … गाडी वर येताना .अगदी 20 च्या स्पीड ने येणार ..गाडी स्लीप होऊ नये म्हणून(अशी कारण द्यायचा, माहीत असायच त्याला पण पावसात भिजयचय)… गाडी लावून वर येईपर्यंत कमीतकमी 10 min घ्यायचा…तोपर्यंत अगदी ठरल्या प्रमाणे चहाच आधाण ठेवायचे मी आणि towel घेऊनबाहेरपळायचे …त्याने बेल वाजवन्या आधीच दार उघडून रागाने त्याला पाहत बसायच.." भिजलास ना!! " .मी आजरी पडू नये म्हणून काळजी की मला भिजू नाही देणार आणि स्वतः मात्र मनसोक्त चिंब भिजून येणार..इतक की जिथे उभा राहील तिथे तळ व्हायच अक्षरशः…
मग मिश्किल चेहरा करून आत यायचा …आणि हातात wallet ठेवून माहणायचा "कागद भिजले , वाळवावी लागतील " `(कागद म्हणजे अक्षरशः 100 /500 च्या नोटा, त्या पावसा पुढे कदाचित कागदाएवढाच महत्वा वाटला असाव त्याला….तसही तो आनंद पैश्यांमधे न मोजता येणारा) .इतक्या भीजलेल्या की अजुन काहीवेळ ठेवल्यातर लगदा होणार…त्या एकेक दूर कायच्या आणि फॅनखाली ठेवायच्या…
चहा कप मधे ओतयच्या आत हा स्वायंपाक घरात पोचलेला….."आत्ताच चहा नको..कांदाभजे खायचे" म्हणून कांदा चिरण्यापासून पीठभिजावेपर्यंत सगळा स्वतःच करणार…मी पाहत बसायचे त्याला..नेमक आवखाळ कोण बाहेरचा पाऊस की हा…. मग मस्त गॅलरी मधे बसून भजे आणि चहाचा आस्वाद घेत बाहेरचा पाऊस न्याहाळयाचा…सोबतीला मागे टेपवर गारवाचे गान …"पाऊस दाटलेला माझया घरावारी हा….दरांस भास आता हळूवार पावलंचा…..” त्या वातावरणात एक वेगळाच रग उमटवत असे.
पाऊस वाढला की हळूच एखादा टपोरा थेंब कपात पडायचा… पण ह्याच लक्ष तिकडे असायच कुठे ..हा कधीच त्या गाण्यासोबत पावसात विलीन झालेला असायचा……..
Pournima

No comments:
Post a Comment